दिनांक २० मे रोजी सीबीडी बेलापूर येथील द पार्क हॉटेल मध्ये 'वाशी समाचार' ह्या मराठी साप्ताहिकाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा मोठया थाटामाटात संपन्न झाला. स्माईल्स फाऊंडेशन च्या सहकार्यातून तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत 'जागरूक नवी मुंबईकर अभियान' ह्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. यावेळी मुख्य अतिथी म्हणून वाशी टाइम्स चे मुख्य संपादक व्ही. के. एन. नायर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल माने, स्माईल्स फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. धीरज अहुजा आणि स्माईल्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. उमा अहुजा आदी उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विशाल माने यांनी 'जागरूक नवी मुंबईकर अभियान' या विशेष कार्यक्रमामध्ये ऑनलाइन फ्रॉड, मुली-महिलांसंबंधित गुन्हे व सुरक्षा, सोशल मिडिया संबंधित सायबर गुन्हे व त्याबाबत घ्यावयाची काळजी, जॉब फ्रॉड, अमली पदार्थ सेवन व व्यसनमुक्ती, जेष्ठ नागरिकांची सुरक्षा व काळजी, बेवारस आणि संशयास्पद वस्तु तसेच रस्ते सुरक्षा व अपघात प्रतिबंध, ड्रायविंग लायसन संबंधित नियम, गुड टच - बॅड टच अशा अनेक मुद्यांवर सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. नवी मुंबई मध्ये 100 नंबर ऐवजी 112 हा नंबर आपत्कालीन नंबर म्हणून डायल करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.व त्याबद्दल सविस्तर माहिती दिली.