(मुंबई ) परब्रम्ह भगवान श्री. मुंगसाजी माऊली यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या मुंबई चर्चगेट रेल्वे स्टेशन पूर्वेकडील चौकाचे नामकरण भगवान श्री मुंगसाजी माऊली असे करण्याचे माऊली परिवाराची मागणी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांनी पूर्ण केली.
मुंबई चर्चगेट नवीन महाल येथे भगवान मुंगसाजी माऊली यांच्या वास्तव्याने पावन झालेले चर्चगेट व मरीन ड्राईव्ह परिसर माऊली परिवारातील भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. याच ठिकाणी भगवान मुंगसाजी माऊली यांचे महापरिनिर्वाण झाले होते. वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीमध्ये माऊली परम भक्त ऋषीतुल्य कर्मयोगी स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे यांच्या पुढाकाराने मंदिर उभे राहिले.
मुंबई चर्चगेट नवीन महाल येथे भगवान मुंगसाजी माऊली यांच्या वास्तव्याने पावन झालेले चर्चगेट व मरीन ड्राईव्ह परिसर माऊली परिवारातील भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. याच ठिकाणी भगवान मुंगसाजी माऊली यांचे महापरिनिर्वाण झाले होते. वाळकेश्वर येथील बाणगंगा स्मशानभूमीमध्ये माऊली परम भक्त ऋषीतुल्य कर्मयोगी स्वर्गीय तात्यासाहेब बोंद्रे यांच्या पुढाकाराने मंदिर उभे राहिले.
त्याचप्रमाणे चर्चगेट नवीन महाल येथील परिसरात भगवान मुंगसाजी माऊली यांचे स्मृतिस्थळ व्हावे अशी इच्छा कित्येक वर्षापासून सकल माऊली परिवार मनी बाळगून आहे. कोरोना काळात या ठिकाणी मंदिरावर झालेली कारवाई असो वा चर्चगेट चौकाचे नामकरण असो मंदिर पूर्ववत करण्याकरिता व चौकाचे नामकरण करण्याकरिता संजयभाऊ राठोड यांनी पुढाकार घेतला व हे सर्व पूर्ववत केले. याकरिता माऊली परिवार त्यांचा ऋणी आहे. चर्चगेट परिसरात भगवान मुंगसाजी माऊली यांचा स्मृतीशिल्पा करिता त्यांनी जो पुढाकार घेतला आहे. त्यामुळे संजयभाऊ राठोड यांचे नाव माऊली परिवाराच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल. अशी भावना माऊली पत्राचे संपादक व माऊली सेवा संघाचे संस्थापक उमेश चौधरी (मुंबई) यांनी व्यक्त केली.
श्रीक्षेत्र धामणगाव देव जि. यवतमाळ, येथे भव्य भक्त निवास, मंगल कार्यालय, मुंगसाजी माऊली सागर चे भव्य निर्माण, राज्यच नव्हे तर देश विदेशाच्या काणाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सर्व सुख सुविधा करण्यासाठी घेतलेला पुढाकार तसेच मुंबई येथील चर्चगेट ठिकाण परिसरात मंदिराकरिता घेतलेला पुढाकार, चौकाचे नामकरण हे कार्य खूप कौतुकास्पद आहे. या कार्याचा गौरव म्हणून येणाऱ्या काळात मुंबई येथील कार्यक्रमात माऊली सेवा संघ मुंबई, अशोकपुष्प प्रकाशन व विदर्भ समाज संघ, मुंबई (संस्थापक श्री.गजानन नागे) व माऊली भक्तांच्या पुढाकाराने श्री संजय भाऊ राठोड यांचा भव्य सत्कार करण्यात येणार असल्याचे योजिले आहे.
आज बुधवार , दिनांक १७ मे २०२३ रोजी श्री. संजयभाऊ राठोड यांनी चर्चगेट मुंबई येथील सभोवताली वर्दळीच्या व दर्शनी भागातील वाहतूक बेट सुशोभित करून त्या ठिकाणी भगवान श्री. मुंगसाजी माऊली यांचे आध्यात्मिक व सामाजिक सेवाकार्य याची माहिती देणारे स्मृतीशिल्प उभारण्यासाठी जागेची पाहणी केली.