भारतीय संस्कृती व नृत्यकला जपत सिंधु नायर प्रस्तुत घुंगरू चे यशस्वी आयोजन.


भारतीय संस्कृती व नृत्यकला जपत सिंधु नायर प्रस्तुत घुंगरू चे यशस्वी आयोजन.

(नवी मुंबई) सिंधु नायर यांच्या वतीने घुंगरू या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व नृत्यकला सादर करण्यात आली. देशाच्या कानाकोपऱ्यातून पाचशेच्या वर कलाकारांनी या नृत्याच्या कार्यक्रमात आपली नृत्यकला सादर करीत सर्वांची मने जिंकली. सिडको सभागृहात आयोजित या कार्यक्रमात दिवसभरात वेगवेगळे नृत्यप्रकार सादर करण्यात आले. 
        या कार्यक्रमात भरतनाट्यम, कथ्थक, ओडिसी, कुच्चिपुडी, मोहिनीअट्टम, यक्षगान या क्लासिकल नृत्यांचे सादरीकरण हे आपल्या देशाची विविधता व एकता दर्शवित होती. लोक नृत्यांमध्ये गुजराती,लेली लेमडी, तिरू अद्दकली, गोंधळ, तेलगु नृत्य, सबलपुरी,कश्मिरी आणि महाराष्ट्राची लाडकी लावणी सादर करीत प्रेक्षकांना पाय थिरकवण्यास मजबूर केले. याचबरोबर बॉलीवूड डान्स, सेमी क्लासिकल,कंटेम्पररी फ्युजन व इतर नृत्यप्रकार सादर झाले. या कार्यक्रमास आपले नृत्य सादर करण्याकरिता सुरत, नागपूर, अहमदाबाद, चंदीगड व इतर राज्यातील कलाकार घुंगरू मध्ये सहभागी झाले होते.
         या कार्यक्रमाला यशस्वी संपन्न करण्याकरिता मेकर्स च्या सीईओ रेखा मिराजकर यांनी पुढाकार घेतला व या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन करत ऋषिकेश मिराजकर यांनी रंगत भरली. कार्यक्रमाचे आयोजक सिंधु नायर यांनी सांगितले "की कोवीड मुळे कलाकारांची खूप वाईट अवस्था झाली होती. त्यांना व्यासपीठ मिळावे याकरिता कोणत्याही कलाकारांकडून एकही रुपया फी घेतली नाही. त्यांच्या कलेला व्यासपीठ मिळावे हाच एक हेतू होता.भविष्यात हा कार्यक्रम देशाच्या बाहेर सुद्धा आयोजित करण्यात येणार आहे".   
        या कार्यक्रमाला नामवंत मान्यवरांनी आपली हजेरी लावत शुभेच्छा दिल्यात ज्यामध्ये माजी खासदार व नवी मुंबईचे प्रथम महापौर डॉक्टर संजीव नाईक, माजी उपमहापौर अविनाश लाड, आमदार नरेंद्र पाटील, नेते हाजी अराफत शेख , तृप्ती सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री अर्चना नेवरेकर , माजी नगरसेविका वैशाली नाईक, सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त राजाराम देशमुख , कथकली नृत्यांगणा तारा वर्मा ,जयश्री नायर, गार्गी बालकृष्ण, लायन्स क्लबचे माजी गव्हर्नर नरेंद्र भंडारी , रितु दत्ता, रेखा गौर, विजय शुकला, संजीवकुमार व इतर मान्यवर उपस्थित होते.
Previous Post Next Post