केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रिद्धीमा फाउंडेशन च्या शाळेचा लोकार्पण सोहळा संपन्न


उलवे येथील पहिली कर्णबधिर व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ची शाळा सुरू करण्यात आली आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते या शाळेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. रिद्धिमा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष किशोर गायकवाड यांचे स्वप्न सत्यात उतरले . सर्वसामान्य कुटुंबाला सुद्धा परवडेल अशी शाळा त्यांनी सुरू केली आहे. या ठिकाणी मापक दरात विशेष विद्यार्थ्यांना फायदा मिळणार आहे. भविष्यात या शाळेला सर्वतोपरी मदत सरकार करेल असे आश्वासन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या भाषणात दिले. यावेळी अनेक मान्यवर शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित होते नाशिकचे युवा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात. यावेळी समाजातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच चंद्रकांत जगताप, महेश खरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
Previous Post Next Post