नृत्य दिग्दर्शक चिन्मय पाडी यांची "डान्स इनेशेटिव्ह प्रोग्राम" ची घोषणा
(नवी मुंबई) नृत्य क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत या क्षेत्रात करियर करणाऱ्यांसाठी "डान्स इनेशेटिव्ह प्रोग्राम" ची घोषणा करण्यात आली आहे. सोल टू सोल डान्स अकॅडेमी च्या वतीने वाशीच्या सिडको सभागृहात समर शोकेस २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करीत सर्वांची मने जिंकलीत. ही नृत्य शाळा आपल्या दहाव्या वर्षात पदार्पण करीत असल्याने ऑगस्ट मध्ये "रुह १५" या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.
नवी मुंबई मध्ये ज्यांना उत्तम प्रकारे हि कला आत्मसात करायची आहे त्यांनी सोल टू सोल डान्स अकॅडेमी मध्ये विविध नृत्य प्रकार शिकण्याची संधी घ्यावी असे आवाहन नृत्य दिग्दर्शक चिन्मय पाडी यांनी केले. नवी मुंबई मध्ये प्रथमच बॅले,कंटेम्पररी,जॅझ हिपहॉप तसेच मलखांब चे नृत्य सादर करण्यात आले. "डान्स इनेशेटिव्ह प्रोग्राम" मध्ये जागतिक दर्जाचे नृत्य शिकवले जातील तीन महिन्याच्या या कोर्स मध्ये भारताच्या विविध भागातून विद्यार्थी सहभागी होतील. या कार्यक्रमामध्ये भावना होंडाच्या व्यवस्थापकीय संचालिका अपर्णा शहा, रेखा चौधरी, डॉ. वंदना जैन, डॉ. जयश्री भागवत, नृत्य दिग्दर्शक अर्जुन मेनन, नृत्यशक्ती च्या संचालिका रितू वॅरियरर ,भावना पुरोहित,साहिल मयंकर तसेच इतर मान्यवर व पालक, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नृत्य सादर करताना बालगट