नवी मुंबईत रंगली राष्ट्रीय पातळीवरील वन कल्चर नृत्य स्पर्धा

वन कल्चर नृत्य स्पर्धेला उत्तम प्रतिसाद
नवी मुंबईत रंगली राष्ट्रीय पातळीवरील वन कल्चर नृत्य स्पर्धा
(नवी मुंबई) जागतिक नृत्य दिनाचे औचित्य साधून एम के क्रिएशन व नाद तरंग स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्धमानने राष्ट्रीय पातळीवर वन कल्चर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वाशीच्या विष्णुदास भावे नाटयगृहात नृत्य क्षेत्रातील अनेक कलावंताच्या उपस्थिती मध्ये अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य परीक्षक म्हणून डान्स दिवाणे आणि इंडियाज बेस्ट डान्सर या सुप्रसिद्ध शोचा नृत्य दिग्दर्शक सागर बोरा व नृत्य दिग्दर्शक एडन परेरा या दोघांनी विजेते निवडलेत. वयोगट ५ ते १४ मध्ये प्रथम क्रमांक लिट्ल फूट क्रू आणि द्वितीय क्रमांक अनन्या खराडे यांनी पटकावला त्याचबरोबर १५ वर्षांच्या वरील वयोगटामध्ये प्रथम क्रमांक इंडियन मार्वल व द्वितीय क्रमांक शून्य या क्रू यांनी मिळवला विजेत्यांना रोख रक्कम , चषक व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

 " नवी मुंबई हे एक सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण व्हावे व कलागुणांना वाव मिळावा याकरिता राष्ट्रीय पातळीवर वन कल्चर नृत्य स्पर्धेचे आयोजन आम्ही केले होते. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला देश्याच्या कानाकोपऱ्यातून प्रथम व उपांत्य फेरीत कलाकारांनी सहभाग नोंदविला. भविष्यात असे कार्यक्रम आम्ही आयोजित करणार आहे " असे मत कार्यक्रमाचे आयोजक मुकेश ठाकूर व श्रेया रस्तोगी व्यक्त केले. या कार्यक्रमाला डॉ. श्रुनाल रजत जाधव यांच्या "बजता रहे" या व्हिडिओ अल्बम चे स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले, उद्योजक राजेंद्र कोलकर,नील सालेकर, सुषमा गोपीनाथ,धर्मेंद्र शर्मा,प्राची शर्मा, आयुष शर्मा (एन एस ए एम ), कौसर अख्तर, संजय देसाई, चाहत सिंग लाफी पॉल , अदनान खान व इतर मान्यवर उपस्थित होते. 
Previous Post Next Post