नवी मुंबई सानपाडा येथे कुटुंब मेळावा व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन
भारतीय जनता पार्टी. सानपाडा यांच्या वतीने बाबू गेनू मैदान सानपाडा येथे, कुटुंब मेळावा, अभिष्टचिंतन सोहळा, स्नेहभोजन, गीत सरगम व लकी ड्रॉ असे अनेक कार्यक्रम सानपाडा वासीयांसाठी 16 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी नागरिकांसाठी अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतात. ते नागरिकांना कुटुंब प्रमाणे एक सदस्य म्हणून त्यांची काळजी घेत असतात. म्हणून कुटुंब मेळाव्याचे आयोजन हे करण्यात आले होते.
निमित्त होते नवी मुंबईचे प्रथम महापौर डॉक्टर संजीव नाईक यांचा वाढदिवस व सुनील कुरकुटे यांचा वाढदिवस. हनुमान जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कोरोना काळात नागरिक घरात राहून त्रस्त झाल्याने गीत सरगम द्वारे त्यांचे मनोरंजन करण्यात आले. यावेळी चित्रपट, भक्ती संगीत व बाबासाहेबांची सुद्धा गाणी गाऊन कार्यक्रमात कलाकारांनी रंगत भरली.
महिला या कुटुंबाच्या प्रमुख असता म्हणून त्यांच्यासाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले व विजेत्या महिलांना पैठणी देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
अशा उत्कृष्ट मेळाव्यात शेकडोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी माननीय खासदार डॉ संजीव नाईक यांनी सांगितले की नवी मुंबई हे शहर मुंबई पेक्षाही जास्त सुख-सुविधा असणारे आहे.
या शहरात आरोग्य, शिक्षण, पाणी, स्वच्छता अशा संपूर्ण गोष्टीत नवी मुंबईच्या विकासामुळे प्रत्येकला याठिकाणी रहावेसे वाटते. सानपाडा विभागात येणाऱ्या काळात येथे सीबीएससी स्कूल व दीडशे बेडचे रुग्णालय हे उभरण्यात येणार आहे यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असे संजीव नाईक यांनी सांगितले.
या कार्यक्रमांत यावेळी शंकर माटे, भाऊ भापकर, सुनील कुरकुटे, शिल्पा ठाकूर, जयश्री दंडवते, शैला पाटील, मंदाकिनी कुंजीर त्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी होण्याकरिता योगदान दिले.या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देताना समाजसेविका जयश्री दंडवते यांनी सांगितले की गणेश नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नेहमीच विविध कार्यक्रम आयोजित करत हा कार्यक्रम सुद्धा आम्ही एकीने पुढे येत यशस्वी आयोजित केला यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांचे आम्हाला फार मोठे सहकार्य लाभले.