सर्वोत्कृष्ट ताजे वं स्वादिष्ट बेकरी उत्पादने मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे " सुपर्ब लाईव्ह बेकरी "..... !!
बेकरी म्हंटलं कि आपल्या समोर एक साधारण केक बेकरी, ब्रेड बेकरी हे चित्र उभं राहत, पण नवी मुंबई येथील सानपाडा मध्ये असलेल्या मोहराज येथे सुपर्ब लाईव्ह बेकरी सुरु आहे. नवी मुंबई मध्ये सुरु झालेली ही पहिली वहिली लाईव्ह बेकरी आहे. " लाईव्ह किचन " ही आगळीवेगळी व सर्वोत्तम संकल्पना घेऊन सुमारे दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2012 साली या बेकरी चे सर्वेसर्वा सुरेश पेडणेकर ह्यांनी ही बेकरी लोकांच्या भेटीस आणली. 1999 रोजी त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केले वं अनेक पारितोषिके मिळवली. गेली दहा वर्षांपासून लाईव्ह बेकरी ही आपल्या सर्वोत्कृष्ट सेवा देत लोकांच्या सेवेत रुजू आहे व त्यांनी अनेक लोकांची मने जिंकली.
इथल्या प्रत्येक गोष्टीत वैविध्य व नावीन्य पहायला मिळत. सर्व प्रकारचे राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय प्रकारचे ब्रेड इथे प्रत्यक्षात तैयार होऊन मग ते लोकांना पुरवले जातात. एंटायर बास्केट हे इथलं वैशिष्ट्य आहे. त्यात केक, मफिन्स, ब्रेड, डेसर्ट, स्नॅक्स, तसेच विविध प्रकारच्या सेव्हरीज चा समावेश आहे. इथला ' बेक चीझ वडापाव ' व ' डच ट्रफल ' केक ला लोकांची विशेष पसंती मिळाल्याचे दिसते. ह्या बेकरीचे वैशिष्ट्य असं कि इथे विविध प्रकारचे विविध चवीचे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत, अगदी लसूण चटणी, शेंगदाण्याची चटणी, व सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांच विशेष आकर्षण ठरलेला हापूस आंबा सुद्धा इथे विक्री साठी उपलब्ध आहे. कोणत्याही साधारण बेकरी मध्ये आपल्याला ज्या गोष्टी पहायला मिळत नाहीं त्या सर्व इथे आढळतात त्यामुळे सुरेश पेडणेकर ह्यांची ही आगळी वेगळी संकल्पना लोकांचं लक्ष वेधून घेताना दिसते. अगदी स्वच्छतेच्या बाबतीत सुद्धा ही बेकरी सर्वोत्तम सिद्ध होत असल्याचे दिसून येते. ग्राहकांच्या मागणी नुसार त्यांना हव्या त्या फ्लेवर चे केक तिथल्या तिथे फ्रेश तैयार करून अगदी पाच मिनिटामध्ये लोकांना पुरवले जातात. म्हणून ग्राहकांची या गोष्टीला विशेष पसंती मिळते. यांची दुसरी शाखा कोपरखैरणे येथे फ्रेश केक्स अँड ब्रेड्स ' या नावाने लोकांच्या सेवेत कार्यरत आहे. त्यामुळेच लाईव्ह बेकरी ही नवी मुंबई मधील सर्वोत्कृष्ट बेकरी ठरली आहे.