सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणाऱ्या गोकुळधाम रेसिडेन्सी च्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या थाटात संपन्न
महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या कीर्तनाने जिंकली उपस्थितांची मने
(नवी मुंबई)आपण कमावलेल्या पैशाला योग्य ठिकाणी गुंतवणूक करून तो पैसा वाढवता येतो. असे सांगत कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून उपस्थितांना संदेश दिला. निमित्त होते नंदादिप ग्रुप यांच्या वतीने गिरवले पनवेल येथे उभ्या राहत असलेल्या भव्य गृहप्रकल्प गोकुळधाम रेसिडेन्सी च्या भूमिपूजन सोहळ्याचे, या गृहप्रकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा विडा युवा उद्योजक सौरभ दशरथ शिंगाडे, आत्माराम सणस , सुभाष कदम, शंकर गोळे, सुरेश जुनघरे यांनी उचलला आहे.
पनवेल लगतच्या गिरवले या ठिकाणी उभ्या राहात असलेल्या या गृहप्रकल्पामध्ये विविध सुखसुविधा सोबतच योग्य किमतीचे फ्लॅट्स उपलब्ध होणार आहेत .
या प्रकल्पाला शुभेच्छा देण्याकरिता समाजातील विविध मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती ज्यामध्ये उद्योगरत्न दशरथ शेठ शिंगाडे, भारतीय जनता माथाडी कामगार संघाचे अध्यक्ष शिवाजी पाटील, न्यू सातारा समूहाचे अध्यक्ष राजाराम निकम, पनवेल झोन चे पोलीस उपायुक्त शिवाजीराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, गिरवले गावचे तंटामुक्त अध्यक्ष महेंद्र गायकर, उद्योकपती संतोष आंबवले, पनवेल ग्रामीण चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सरपंच अनिता गायकर, उपसरपंच प्रताप हातमोडे व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.