नगिण महल, चर्चगेट येथे भगवान मुंगसाजी माऊली पुण्यतिथी निमित्त अभिषेक व प्रसाद वितरण संपन्न...


(मुंबई) संतनगरी श्री क्षेत्र धामणगाव देव चे भगवान मुंगसाजी माऊली यांची ६७ वी पुण्यतिथी ९ मार्च २०२२ रोजी राज्यात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाने सपंन्न झाली. फाल्गुन शुद्ध सप्तमी शके १८७९ बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी १९५८ रोजी सकाळी ९ वाजता ज्या ठिकाणी अर्थातच नगिण महल, चर्चगेट मुंबई येथे माऊली यांनी महासमाधी घेतली. या ठिकाणी मुंबई चे माऊली भक्त दर मंगळवारी महाआरतीचे आयोजन करतात.


 पुण्यतिथी निमित्त अभिषेक व प्रसाद वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला तेव्हा अनिलसिंग बायस, राजसिंग बायस, चित्रकार आनंद दांदळे, किरण राठोड, किशोर भोईर, गजानन गायकवाड, उन्मेष चौधरी, इरिक ट्रेझरीवाला, धनंजय धनू, विजेंद्र धनू, निर्मल जैन, प्रसाद केसरकर व मोठ्या संख्येने माऊली भक्त उपस्थित होते...
Previous Post Next Post