(नवी मुंबई) नवी मुंबई शहराच्या जडणघडणीत बांधकाम व्यावसायिकांचे मोठे योगदान आहे. ग्राहकांना उत्तम घरे देण्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी महत्वाची भूमिका निभावली. नवी मुंबई आणि पनवेल परिसरात आपले उत्तम गृहप्रकल्प उभे करण्यामध्ये कोणार्क ग्रुपचे नाव अग्रेसर आहे. हे नाव कमविण्यासाठी पंचवीस वर्ष सातत्याने गृहप्रकल्प निर्माण करून ती वेळेत देण्यात कोणार्क ग्रुप चे सर्वेसर्वा भाऊसाहेब शिंगाडे यांची दूरदृष्टी आहे. याच कारणामुळे ग्राहकांची संतुष्टी व त्यांचा विश्वास जिंकता आला. सचोटी, सातत्य आणि पारदर्शकता या तत्त्वावर कोणार्क ग्रुप चालतो त्यामुळे ग्राहकांशी वचनबद्ध राहतो. पंचवीस वर्षाच्या या कालावधीत उच्चप्रतीची घरे तेही बजेट मध्ये देण्यात यशस्वी ठरलेत. याचे कारण हे फक्त व्यवसाय वाढविणे हे ध्येय न ठेवता जास्तीतजास्त लोकांच्या घराचे स्वप्न कसे पूर्ण होईल हे उद्धिष्ट राहिले. कोणार्क रिव्हर सिटी हा गृहप्रकल्प कोणार्क ग्रुपने ग्राहकांच्या पसंतीस उतरला आणि अगदी कमी वेळेत यशस्वी पूर्ण झाला त्यामुळे कित्यकांची मने कोणार्क ग्रुपने जिंकलीत.
कोणार्क हेवन्स , कोणार्क मेडोज, कोणार्क गार्डन्स या गृहप्रकल्पाला कोव्हिड काळात काही फरक नाही पडला ते प्रकल्प आपल्या ठरलेल्या वेळत पूर्ण होत आहे. नवी मुंबई तसेच रायगड जिल्यात ज्या विकासकांचे नाव अव्वलस्थानी घेण्यात येते. त्यामध्ये जे बांधकाम व्यवसायिक आहेत ज्यांनी आपल्या ग्राहकांना कोव्हीड सारख्या वाईट परिस्थिती मध्ये ही संतुष्ट ठेवले, त्यामध्ये कोणार्क ग्रुपचे नाव अग्रेसर आहे. आतापर्यंत कमावलेला ग्राहकांचा विश्वास व पंचवीस वर्षे सातत्याने मार्गक्रमन करत असतानाचा आत्त्मविश्वास या जोरावर कोणार्क ग्रुप भव्य गृहप्रकल्प ग्राहकांना देण्यासाठी सज्ज आहे. एक मराठी बांधकाम व्यवसायिक जेंव्हा समाजाचे हित जाणतो व तशी सेवा देतो तेंव्हा कोणार्क ग्रुप सारखे यशस्वी उदाहरण निर्माण होते. या गोष्टी तेंव्हाच साध्य होतात जेंव्हा इतरांचे स्वप्न सत्यात उतरविण्याचे ध्येय डोळ्यासमोर असते. हेच ध्येय भाऊसाहेब शिंगाडे यांनी आपल्याबरोबर समाजाचे हित कसे साधता येईल हे प्रथम स्थानी ठेवले. येणाऱ्या पुढील काळामध्ये ग्रुपच्या वतीने विविध प्रकल्प उभे राहणार आहेत. या प्रकल्पामध्ये उच्चप्रतीची घरे तीही परवडणाऱ्या किंमतीमध्ये देण्याचा मानस त्यांचा आहे.