समाजसेवक अविनाश जाधव यांच्या वतीने संयुक्त शिवजयंती व भीमजयंती चे भव्य आयोजन


शिवजयंती व भीमजयंती हे प्रत्येकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणूनच ते नेहमीच मोठ्या आनंदाने साजरे करण्यात येतात.
१९ फेब्रुवारी २०२२ रोजी सानपाडा प्रभाग क्र. २९ मधील स्थानिक सर्वांचे लाडके समाजसेवक अविनाश जाधव यांच्या वतीने संयुक्त शिवजयंती आणि भिमजयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
सदर सोहळ्यात सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी ते स्वातंत्र्यसैनिक कै. मारुती पन्हाळकर मैदान,सेक्टर ३, सानपाडापर्यंत प्रज्वलित मशालीची मॅरेथॉन धावत कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सकाळी १० वाजता स्थानिक मान्यवारांच्या उपस्थितीमध्ये शिवप्रतिमा आणि भिमप्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी विक्रम पाटील, बळवंत पाटील, सुरेंद्र आढाव, मदन मोहन सिंह,महेंद्र कलबास्कर, ॲडव्होकेट मिलिंद इंगोले, मारुती कदम , सोनु पिळके, शंकर शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात नवी मुंबई मधील अनेक मान्यवरांनी जसे की, माजी महापौर सागर नाईक, माजी विरोधी पक्षनेते दशरथजी भगत , समाजसेवक भाऊ भापकर, शिवसेना सानपाडा - जुईनगर विभागप्रमुख घनःश्याम पाटे, माजी नगरसेवक दिलीप बोर्‍हाडे, सौ. शैला पाटील, राजेश ठाकूर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची प्रशंसा केली व नागरिकांना मार्गदर्शन केले.
           तसेच सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संयुक्त शिवजयंती आणि भिमजयंती सोहळ्याप्रसंगी शिवकथन आणि भिमकथन स्पर्धेचे सर्व वयोगटासाठी आयोजन केले होते. या स्पर्धेला सर्वच वयोगटातील स्पर्धकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
    संयुक्त शिवजयंती आणि भिमजयंती कार्यक्रमाची सांगता ही महिलांच्या हस्ते दीपोत्सव साजरा करीत करण्यात आली. अशा प्रकारच्या उत्तम कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे अविनाश जाधव यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Previous Post Next Post