"घार हिंडे आकाशी, तिचे मन पिलापासी ":-सिद्ध सदगुरु शिलनाथ महाराज,पंढरपूर
अकोला येथील संत राजू महाराज, अमरावती येथील माऊली महाराज ,अन्य संत महंत महाराजांची उपस्थिती
कोहिनुर कॉलनित संत गजानन महाराज मुर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न
कारंजा (लाड) : दिं ७ फेब्रुवारी रोजीच्या कोहिनुर कॉलनीतील संत गजानन महाराज मूर्ती प्रतिष्ठा कार्यक्रम प्रसंगी संत महंत महाराज यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना श्री सिद्ध सदगुरु शांतीनाथ महाराज यांचे शिष्य पंढरपूर येथील शिलनाथ महाराज यांनी सांगितले की, या प्राणप्रतिष्ठेस सिद्ध सदगुरु शांतीनाथ महाराज येणार होते परंतु ते दवाखान्यात भरती असल्याने येऊ शकले नाही परंतु त्यांनी आम्हास कागदावर लिहून सांगितले की, आपण जावे व कार्यक्रम संपन्न करावा .यावरून असे दिसून येते की महाराज दवाखान्यात भरती असूनही त्यांचे लक्ष मात्र भक्तांकडे असते .
"घार हिंडे आकाशी,तिचे मन पिलापासी ".या कार्यक्रमास सिद्ध शांतीनाथ महाराज यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त झाले आहेत व त्यांच्या आज्ञेत आम्ही इथे पोहचलो आहे. या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम सदगुरु आशीर्वादाने संपन्न झाला.
याच कार्यक्रमात हभप रामेश्वर खोडे महाराज यानी मार्गदर्शन करून वाईट व्यसन सोडण्याचे आवाहन उपस्थीत भक्तांना केले .कार्यक्रम प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. राजीव काळे, माजी नगराध्यक्ष दत्ता पाटील डहाके, आदीसह अन्य मान्यवर यांनी आपले विचार मांडलेत.
येथील कोहिनुर कॉलनित संत गजानन महाराज मूर्ती ,नंदी ,शिवलिंग मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम निमित्य दिं 6 व दिं 7 फेब्रुवारी रोजी नियोजित विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झालेत.
दिं 7फेब्रुवारी रोजी संत गजानन महाराज प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम अनेक संत, महंत,महाराज यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.संत राजु महाराज, अकोला,श्री योगीराज माऊली महाराज,श्री शिलनाथ महाराज पंढरपुर,श्री रंगनाथ महाराज आळंदी,श्री धर्मनाथ महाराज,रामगाव रामेश्वर,श्री दीक्षित महाराज रामगाव रामेश्वर,व्यसनमुक्ती प्रचारक श्री रामेश्वर महाराज खोडे,इसापूर,श्री माऊली महाराज,श्री जितेंद्र महाराज पाठक,डॉ इंगोले कोंडोली ,पंकज पाटील ठाकरे ईत्यादी साधू संत महंत उपस्थीत होते.संत गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पूर्वी सकाळी होम ,हवन, पूजा पाठ करण्यात आली.त्यानंतर उपस्थीत संत महंत महाराजांनी संत गजानन महाराज मूर्ती, शिवलिंग, नंदी आदी मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली .त्यानंतर व्यासपीठावर सर्वश्री संत राजु महाराज, अकोला,श्री योगीराज माऊली महाराज,श्री शिलनाथ महाराज पंढरपुर,श्री रंगनाथ महाराज आळंदी,श्री धर्मनाथ महाराज,रामगाव रामेश्वर,श्री दीक्षित महाराज सावंगी रामगाव रामेश्वर,व्यसनमुक्ती प्रचारक श्री रामेश्वर महाराज खोडे,इसापूर,श्री माऊली महाराज,श्री जितेंद्र महाराज पाठक,कारंजा ईत्यादी साधू संत महंत उपस्थीत होते.
कार्यक्रमात व्यासपीठावर साधुसंतासह अनेक मान्यवर उपस्थीत होते.माजी नगराध्यक्ष मा श्री दत्तराज डहाके,भाजपा तालुकाध्यक्ष डॉ राजीव काळे,दैनिक देशोन्नती प्रतिनिधी गोपाल पाटील भोयर,जयश सेठ लोढाया,भाजपा शहराध्यक्ष ललीत चांडक,यशवंत बापु देशमुख,विशाल गीते,प्रवीण राठोड,दामू अण्णा ,ठाकरे साहेब,श्री कडू, श्री नवघरे ,डॉ इंगोले कोंडोली,ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.व्यासपीठावर उपस्थीत सर्व साधू संत,महंत, महाराज व मान्यवर यांचे कोहिनुर कॉलनी संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला .मंदिरास दान देणाऱ्या उपस्थीत मान्यवर यांचा सत्कार करण्यात आले सर्व देणगी दात्यांचे नावे जाहीर करण्यात आली सर्वांचे आभार मानण्यात आले.
संत गजानन महाराज मंदीराचे विश्वस्थ मार्गदर्शक सर्वश्री राजीव भेंडे ,अध्यक्ष विजय पाटील राऊत यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन केले व यावेळी विश्वस्थ बाळू पाटील चौधरी,हर्षल काटोले, ज्ञानेश्वर ठाकरे ,गणेशराव महल्ले,कमलेश जाधव,संतोष राऊत,बंडू पाटील,राजेश ढवक सर,किरण राठोड, कृष्णाजी भेंडे,संतोष डुकरे, अमोल जुमळे,पुरुषोत्तम शर्मा,गजानन नेमाने,शाम सावंत, बाळू जाधव,विजय गायकवाड,येवले पाटील,कदम, गणेश राठोड,सचिन इंगोले,गोपाल पुणेवार, नितीन कंचनपुरे,सुभाष चौधरी, निलेश चौधरी,गजानन जाधव,भोजने सर,हजारे सर,नगरे सर,पांडे सर, करंदीकर,नाना वरघट,मेथळे सर,सुरज चौधरी,गोपाल पाठे,राजेश ढोके,सांगोळे,गोकुल राठोड इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. मूर्ती प्रतिष्ठा,सत्कार समारंभ नंतर संध्याकाळी किन्ही येथील मंडळाने हरिपाठ करून सेवा दिली तसेच चांभई येथील भजन मंडळाने भजनाचा कार्यक्रम करून सेवा दिली .किन्ही व चांभई येथील उपस्थीत कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला .
दिं 6 फेब्रुवारी रोजी सकाळी संत गजानन महाराज मूर्ती,शिवलिंग, नंदी आदी मूर्तीची या कॉलनित मिरवणूक काढण्यात आली तसेच भाविकांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढून , घरासमोर येणाऱ्या रथातील मूर्तीची पूजा केली , यात सामील कोंडोली येथील संत पितांबर महाराज यांच्यासेवेत असणारे पालखीचे भक्त विशेष आकर्षण होते .सर्व परिसर संत गजानन महाराजांचे नामघोषाने दणाणून गेला होता.ठीक ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्यात व पुष्प वृष्टी करण्यात आली . यात कोहिनुर कॉलनी, परिसरातील ईतर कॉलनीतील नागरिकांचा समावेश होता.पालखी सोहळा समाप्ती नंतर संत गजानन महाराज संस्थान कोहिनुर कॉलनी यांनी मा. श्री .आप्पाराव चौधरी,हभप विठ्ठलराव महाराज ,डॉ इंगोले कोंडोली ,यशवंतबापु देशमुख,अजयजी जयस्वाल,संजय भेंडे, पुरुषोत्तम गुंजाटे,विजय गायकवाड,दामुअण्णा ईत्यादी मान्यवरांचा व्यासपीठावर शेला नारळ देऊन सत्कार केला. तसेच कोंडोली येथील उपस्थीत सर्व भक्त गणांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी या ठिकाणी दिलेल्या सेवेचा उल्लेख प्रामुख्याने करण्यात आला.तसेच संध्याकाळी 6 वाजता किन्ही रोकडे येथील श्री संत लष्करी महाराज हरिपाठ मंडळाचा हरिपाठ कार्यक्रम संपन्न झाला .त्यानंतर प्रवीण पाटील लुंगे व त्यांची टीम,सोनिवाळ यांच्या मार्फत भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.अतिशय बहारदार असा हा कार्यक्रम झाला असुन रसिकांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रम संचलन प्रा सुधाकर काळे सर ,रमेशराव राठोड यांनी केले सर्वांचे आभार,देणगी दात्यांचे आभार विश्वस्थ राजीव भेंडे यांनी मानलेत.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोहिनुर कॉलनी, लगतच्या कॉलनीतील नागरकांनी परिश्रम घेतले. सर्वांचे आयोजकांनी आभार मानलेत.तसेच या कार्यक्रमात महिला ,बाल गोपाल, मुलं मुली यांनी हिरिरीने भाग घेतला. सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा व संत दर्शनाचा लाभ घेतला.