महिलांच्या कलागुणांना वाव देणारी स्पर्धा "कोण जिंकणार खेळ पैठणीचा"

 (नवी मुंबई) मकर संक्रांतीचे औचित्य साधून  "कोण जिंकणार खेळ पैठणीचा" या स्पर्धेची घोषणा करण्यात आली. पोस्टर चे विमोचन नवी मुंबईतील विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी आवाहन केले की जास्तीत जास्त महिलांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा.


मा. नगरसेविका सलुजा सुतार, मा. नगरसेवक संदीप सुतार, मा. नगरसेवका पुनम मिथुन पाटील, मा. नगरसेवक रवींद्र इथापे या मान्यवरांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात.

जानेवारी महिना हा महिलांसाठी खूप खास असतो कारण मकरसंक्रांत आणि घरोघरी, महिलामंडळामध्ये, कार्यालयात तसेच सोसायटी मध्ये होणारे हळदीकुंकवाचे कार्यक्रम. या कार्यक्रमांना विशेष करण्याकरिता चितळे एक्स्प्रेस सीवूड्स च्या माध्यमातून "कोण जिंकणार खेळ पैठणीचा" ही आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चितळे एक्स्प्रेस सीवूड्सच्या आउटलेट मध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहक महिलांना पैठणी व विविध पारितोषिके जिंकण्याची संधी प्राप्त होणार आहे. या स्पर्धेचे परीक्षक हे सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अनिसदिन हे आहेत. त्यांचे नाव फॅशेन जगात नामवंत सेलेब्रिटी करीता ड्रेस डिजाईन करण्याकरीता ओळखले जाते. तसेच सुप्रसिद्ध आहारतज्ञ सायली भोसले वजन संतुलित ठेवण्याकरीता अंतिम फेरीत टिप्स देणार व स्पर्धकांच्या रेसीपीचे त्या परीक्षण करतील. चितळे एक्स्प्रेस सीवूड्स आउटलेटचे मालक सागर कळाणे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की "आमच्याकडे खरेदी साठी येणाऱ्या बहुतेक ग्राहक या महिला असतात. त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरीता "कोण जिंकणार खेळ पैठणीचा" ही स्पर्धा आयोजित करून आम्ही एक व्यासपीठ निर्माण करतो. प्रत्येक महिलांमध्ये काहीनाकाही गुण असतो. तो मग गाण्याचा, अभिनयाचा, नृत्याचा, उत्तम पदार्थ बनविण्याचा वा इतर असो या स्पर्धेच्या माध्यमातून त्या सादर करू शकतात."
या स्पर्धेत सहभागी होण्याकरीता चितळे एक्स्प्रेस सीवूड्स आउटलेट भेट देऊन आपण आपल्या आवडीचे उत्पादने खरेदी करून ते बिल दाखवून निवड निश्चित करू शकता . तसेच ७९०००४४६६० या नंबर वर फोन करून होम डिलिव्हरी मागू शकता किंवा झोमॅटोवर सुद्धा खरेदी करू शकता. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी फक्त चितळे एक्स्प्रेस सीवूड्स आउटलेट मध्ये खरेदी करणे अनिवार्य आहे. पहिली फेरी ही ऑनलाईन पद्धतीने परंपरा फॅशन आयकॉन च्या इंस्टाग्राम आयडी वर स्पर्धकांचा फोटो व त्या फोटोचे आर्टवर्क पोस्ट करून घेण्यात येईल. या मध्ये ज्यांना जास्तीतजास्त लाईक, कमेंट, स्टोरी शेअर मिळतील व परीक्षकांना त्या उत्तम वाटेल अश्या महिलांची अंतिम फेरी होईल. यावेळी त्यांच्यात असलेले कलागुण व पैठणीचा खेळ जिंकून विविध पारितोषिके जिंकता येणार. ही स्पर्धा एक उत्तम व्यासपीठ निर्माण करून देत आहे कारण विविध सौंदर्यस्पर्धा जिंकणाऱ्या विजेता त्यांना मार्गदर्शन करतील. फॅशन वॉल्क, डिझायनिंग कपडे, फॅशन ग्रूमिंग, सौंदर्य आत्मविश्वास वाढविण्याकरीता व फिट राहण्यासाठी नामवंत मार्गदर्शन करणार. श्री स्वामिनी सिल्क ॲंड सारीजचे प्रकाश मर्ढेकर आणि सुरेश सणस यांनी सर्व सहभागी स्पर्धकांना त्यांच्या आउटलेट वर पैठणी खरेदी केल्यास दहा टक्के सवलत घोषित केली आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आजच चितळे एक्स्प्रेस सीवूड्स, श्री रामकृष्ण सीएचएस , शॉप न १५ ,सेक्टर ४०, ग्रँड सेंट्रल मॉल समोर, सीवूड पश्चिम च्या  आउटलेट ला भेट द्या.अधिक माहिती करीता व स्पर्धेविषयी जाणून घेण्यासाठी संपर्क करा ९०२२७४४०४०, ०२२४९६७७८७६




Previous Post Next Post